रायसोनी कॉलेज पुणेच्या विद्यार्थी संघ फिनोव्हेटर्सला टेम-ए-थॉन हॅकेथॉनमध्ये उपविजेतेपद
पुणे : जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणेच्या विद्यार्थी संघ फिनोव्हेटर्सने चेन्नईतील अण्णा विद्यापीठात टेमेनोसने आयोजित केलेल्या टेम-ए-थॉन, ऑफलाइन हॅकेथॉनमध्ये उपविजेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांना संयुक्तपणे अॅपल आयपॅड एअर २ पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आले. या संघात बी टेक संगणक अभियांत्रिकीच्या एआय विभागाचा विद्यार्थ्यी लक्ष्य माकोडे, एआय व एआय एमएल विभागाच्या द्वित्तीय वर्षाचा विद्यार्थी स्वप्नील पाटील आणि सुमित गोंड यांचा समावेश होता.

टीम फिनोव्हेटर्सने त्यांचे समस्या सोडवण्याचे कौशल्य आणि नाविन्यपूर्ण मानसिकतेचे प्रदर्शन करत पुरस्कार जिंकला. विद्यार्थ्यांचा प्रकल्प वेगाने विकसित होत असलेल्या फिनटेक क्षेत्रातील एक महत्त्वाचा मुद्दा असलेल्या बँकिंगमध्ये एआयच्या नैतिक वापरावर भर दिला. तंत्रज्ञानावर आधारित, एआय-आधारित दृष्टिकोन वापरून, त्यांनी बँकिंग प्रणालींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे व्यावहारिक आणि जबाबदार अनुप्रयोग देणारे समाधान विकसित केले.
रायसोनी कॉलेज पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खराडकर म्हणाले की, ही कामगिरी आमच्या विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्णता आणि नैतिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी प्रेरणादायी आहे. तंत्रज्ञान आणि नवोपक्रमात भविष्यातील सक्षम नेत्तृव घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. वास्तविक जगातील आव्हानांना तोंड देणारे विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत आहोत.
रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी आणि रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी आणि रायसोनी कॉलेज पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खरडकर यांनी टीम फिनोव्हेटर्स सदस्यांचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.