रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट पुणेच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलला 4-स्टार रेटिंग
पुणे : जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट पुणेच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलने केंद्रिय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल तर्फे आयोजित आयआयसी 6.0 रँकिंगमध्ये 4-स्टार रेटिंग मिळाले आहे. रँकिंगमध्ये भारतातील 12,773 संस्थांनी सहभाग नोंदवला होता.

या यशावर बोलताना, रायसोनी कॉलेज पुणे चे कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खराडकर, म्हणाले, “आमच्या वार्षिक कामगिरीसाठी इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल(IIC-6.0) कडून हे मानांकन मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. आमच्या संस्थेमध्ये संशोधनात्मक आणि नाविन्यपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहे. हे यश उच्च शिक्षणात नवकल्पना आणि उद्योजकता वाढवण्यासाठी मदत करेल.
रायसोनी कॉलेज पुणे भविष्यात नावीन्य आणि उद्योजकता उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यासाठी अजूनही समर्पित आहे. रायसोनी कॉलेजच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलचे अध्यक्ष डॉ आर डी खराडकर, डॉ प्रा सारिका खोपे, डॉ प्रा सोनाली सोनवणे, आणि आणि डॉ स्वप्नील महाजन यांनी विशेष कार्य या सेलसाठी केले.
रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी, रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी आणि रायसोनी कॉलेज पुणे चे कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खराडकर यांनी आयआयसी इव्हेंट्स आणि उपक्रमांच्या यशात योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अभिनंदन केले.