आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकीचे प्रा. प्रदीप पाटील यांना पी.एच.डी. पदवी प्रदान
शिरपूर: येथील शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील आर्टीफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेले प्रा. प्रदीप कैलास पाटील यांना राजस्थान येथील अमिटी युनिव्हर्सिटी, जयपूर येथून यांत्रिकी अभियांत्रिकी विभागांतर्गत डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली“इन्व्हेस्टिगेशन ऑन व्हेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम युजिंग नॅचरल रेफ्रिजरंट अँड नॅनोल्युब्रिकंट” हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय होता. या कामी त्यांना अमिटी विदयापीठाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील प्रा. डॉ. ऋषी देवांगन यांचे मुख्य मार्गदर्शक तर आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्याल, शिरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील डॉ. हेमंत वाघ यांचे सह-मार्गदर्शक म्हणून अनमोल मार्गदर्शन लाभले.
प्रा. प्रदीप पाटील यांचे संशोधनपर शोधनिबंध स्कोपस इंडेक्स सारख्या अंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल्समध्ये प्रकाशित झाले असुन अनेक परिसंवाद व परीषदांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवित त्यांच्या संशोधन विषयावर आधारित सादरीकरण केले आहे. ह्या संशोधनाचा उद्देश नैसर्गिक रेफ्रिजरंट्स आणि उत्कृष्ट नॅनो-ल्युब्रिकंट्स वापरून व्हेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन प्रणालींचे कार्यक्षम करून त्याचा अधिकाधिक वापर व्हावा हा होय. यामुळे सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या आणि पर्यावरणास घातक असलेल्या हायड्रोक्लोरोफ्लुओरोकार्बन (HFC) या वायूचा रेफ्रिजरंट म्हणून वाढत्या वापरास आळा घालता येईल. डॉ. प्रदीप पाटील यांच्या सदर संशोधन कार्यामुळे हायड्रोक्लोरोफ्लुओरोकार्बन (HFC) च्या तुलनेत अधिक शाश्वत आणि ऊर्जा कार्यक्षम रेफ्रिजरंट चा पर्याय शोधणे असा होता.
डॉ. प्रदीप कैलास पाटील यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव रेषा पटेल, संचालक अतुल भंडारी, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा.सुहास शुक्ल, विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकिरे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, डॉ. डी. आर. पाटील, डॉ. उज्वला पाटील, डॉ. एस. ए. पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. एम. पी. जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.