देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात क्वसार्स-2024 वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थानशास्त्र महाविद्यालय येथे क्वसार्स-2024 या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतीक कार्यक्रमाचा समारोप समारंभ दि. 23 मार्च 2024 रोजी दिमाखात साजरा झाला. या दोन दिवसीय सांस्कृतीक कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्याविष्कार व गित गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांना आपल्या तालावर नाचण्यास भाग पाडले. यामध्ये एकल, युगल, समुह नृत्य आणि गितांचे सादरीकरण करण्यात आले, यामध्ये भारतीय व पाश्चात्य कलेचा संगम बघावयास मिळाला तसेच भावसाक्षरता, राष्ट्रीय जबाबदारी, निसर्गाबाबतची कृतज्ञता, या समाजमन घडवणाऱ्या विषयावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.
नृत्यामध्ये भरतनाटयम, लावणी, कोळी नृत्य, भांगडा, पाश्चात्य असे विविध प्रकार सादर करण्यात आले. गित गायनामध्ये भावगित, श्रृगांर गित, कोळी गित, लोक गित, युगल गित, भक्ती गित, चित्रपट गिते व लावणी अशाप्रकारचे गित व गाण्यांची मेजवाणी होती. सुंदर नृत्य अविष्कार, सुमधुर गाणी व रंगबेरंगी वेषभुशेने नटलेल्या श्रोत्यामुळे असे वाटत होते की, जणू काही देवगिरीमध्ये मिनी बॉलीवुडच अवतरले होते. क्वसार्स-2024 मध्ये तरुणाईचा अभुतपुर्व असा जल्लोष होता. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ प्रकाशदादा सोळुंके, सचिव आ सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य विश्वास येळीकर, प्रदीप चव्हाण यांनी स्नेहसंमेलन आयोजकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ सुभाष लहाने, स्नेहसंमेलन संयोजक डॉ गजेंद्र गंधे, सहसंयोजक डॉ रुपेश रेब्बा व प्रा अनिल वाकणकर, विभागप्रमुख डॉ सत्यवान धोंडगे, प्रा संजय कल्याणकर, डॉ राजेश औटी, डॉ सचिन बोरसे, डॉ शोएब शेख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी परीश्रम घेतले.