पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मुक्त विद्यापीठात साजरी

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी करण्यात आली. मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे व प्र – कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांची प्रमुख उपस्थिती होती. सेवानिवृत्त होणारे उपकुलसचिव सौ. अनिता डांगरे व कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक श्री राजाराम बचाटे यांच्या हस्ते महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Advertisement

यावेळी बोलतांना मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले की एका सर्वसामान्य घरातील लेक ते होळकर राजघराण्याची सून आणि महाराणी अहिल्यादेवी ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी असे त्यांचे प्रेरणादायी जीवन आहे. होळकर साम्राज्य स्थिरस्थावर करण्याचे अवघड कार्य त्यांनी केले. या काळात त्यांनी देशातील बहुतांश भागांमध्ये महत्वाच्या तीर्थस्थळी सर्वसामन्यांच्या सोयीसाठी नदीकाठी घाट बांधण्याचे, सुप्रसिद्ध मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे काम केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी देशाची सांस्कृतिक व पारंपारिक ओळख टिकविण्याचे व वाढविण्याचे कार्य केले असल्याचे मा. कुलगुरू प्रा. सोनवणे आपल्या भाषणाच्या अखेरीस म्हणाले. सूत्रसंचलन सहा. प्राध्यापक श्रीमती शुभांगी पाटील यांनी केले तर कुलसचिव श्री. दिलीप भरड यांनी आभार मानले. यावेळी वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील, जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र बनसोडे, ज्ञानस्त्रोत केंद्र प्रमुख डॉ. प्रकाश बर्वे यांच्यासह विद्याशाखा संचालक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *