अभाविपच्या वतीने AIMS इन्स्टिट्यूट येथे ‘पुंगी बजाओ आंदोलन’
विद्यार्थ्यांची आर्थिक लुटमार करणाऱ्या AIMS विरोधात अभाविप आक्रमक
अभाविप चे युनिक अकॅडमी बाहेर आंदोलन
पुणे : AIMS Institute जे Unique Academy सोबत संलग्न असल्याचा दावा करते त्यांनी 2 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या कारणावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने AIMS Institute येथे ‘पुंगी बजाओ आंदोलन’ करण्यात आले. वास्तवात MBA कोर्स साठी Fee Regulatory Authority (FRA) नुसार 81 हजार इतकेच शुल्क घेणे अपेक्षित असताना विद्यार्थ्यांकडून 4 लाख तर काहींचे 5 लाख इतके शुल्क आकारले जात होते.
या विषयात वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन देखील, कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. अखेर विद्यार्थ्यांना कॉलेजच्या बाहेर आंदोलनाला बसणे भाग पडले. कोंढवा येथील त्रिनिटी कॉलेज आणि शिवणे येथील ASMA Institute मध्ये देखील असाच प्रकार पहायला मिळाला व गेल्या 6 महिन्यातील फसवणुकीची अशी तिसरी घटना समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील या महाविद्यालयांमध्ये अशा घटना वेळोवेळी होत असून देखील विद्यापीठ प्रशासन अजूनही गप्प आहे.
ह्या अशा बोगस महाविद्यालय व एज्युकेशन पार्टनर च्या नावावर अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक लुटमार केली जात आहे. ह्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अभाविप कटिबध्द आहे असे मत हर्षवर्धन हरपुडे पुणे महानगर मंत्री यांनी व्यक्त केले.