उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी

जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान करता यावे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाच्या आधिसूचनेनुसार मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे.

KBCNMU-GATE

जळगाव, रावेर आणि नंदुरबार लोकसभा मतदार संघात दि १३ मे रोजी तर धुळे लोकसभा मतदार संघात ३० मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाकरीता शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दि १३ मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्या त्या मतदार संघाच्या क्षेत्रातील मतदानाकरीता संबंधित कर्मचाऱ्यांना ही सुट्टी लागू राहिल. अशी माहिती कुलसचिव डॉ विनोद पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com