उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांची जनप्रबोधन करणारी रथयात्रा येणार

जळगाव : नेत्रदान, त्वचादान, देहदान याबाबत फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई, या सामाजिक संस्थेतर्फे जनप्रबोधन करणारी रथयात्रा काढण्यात आली असून ही रथयात्रा मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येणार आहे.

Advertisement
KBCNMU-GATE

नाशिक ते आनंदवन अशी १४३० कि. मी. ची ही रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार अवयवदाना विषयी जनजागृती करण्याची जबाबदारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा वतीने मंगळवारी दुपारी २.०० वाजता विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पुरुषोत्तम पवार, अध्यक्ष व सुनिल देशपांडे, उपाध्यक्ष फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन मुंबई हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती विभागाचे संचालक प्रा. आशुतोष पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page