उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ याबाबत जनजागृती संपन्न
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व क्विक हिल फाऊंडेशन, पुणे तसेच महाराष्ट्र सायबर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील केंद्रीय विद्यालय येथे ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ याबाबत जनजागृती करण्यात आली.
विद्यापीठातील केंद्रीय विद्यालयात क्विक हिल फाऊंडेशन, पुणे व महाराष्ट्र सायबर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थिनी प्रगती कोल्हे व सायली चौधरी यांची ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या योजनेत निवड झाली आहे. या विद्यार्थिंनींनी सायबर सुरक्षेबाबत धडे दिले तसेच क्वीक हिल व महाराष्ट्र सायबर सेलचे कामाची माहिती दिली. त्यांनतर इंटरनेट मार्फत लहान मुलांसोबत जे गुन्हे होतात त्यापासून कसा बचाव करता येतो याबाबतीत सविस्तर माहिती दिली.
यावेळी केंद्रीय विद्यालयाचे संगणक कक्षाचे शिक्षक नितीन पाटील, तसेच प्राचार्य सोना कुमार हे उपस्थित होते. क्वीक हिल फाउंडेशचे सुंगधा दाणी व थकन जानगवळी व संगणकशास्त्र प्रशाळेचे समन्वयक प्रा राजु आमले यांचे मार्गदर्शन लाभले.