स्वहित जपा, परहित जाणा – मानसोपचारतज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णीं
मराठी विभागात प्रकट मुलाखत
छत्रपती संभाजीनगर, दि.१७ : माणसाचं वागणं स्वकेंद्रित असले तरी परकेंद्रीत व शेवटी सर्वकेंद्रीत झाले पाहिजे. ’स्वहित जपा व परहित जाणा’ हाच यशस्वी व आनंदी जगण्याचा मूलमंत्र आहे, अया सल्ला प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांनी दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी व भाषा वाडःमय विभागात तीन दिवसीय व्याख्यानमालेस सोमवारी (दि.१७) सुरुवात झाली.

महात्मा गांधी व्याख्यानमालेतंर्गत डॉ.आनंद नाडकर्णी यांची कवी गणेश घुले यांनी प्रकट मुलाखत घेतली. विभागप्रमुख डॉ.दासू वैद्य, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.वैâलास अंभुरे यांची मंचावर उपस्थिती होती. रसिकांनी खच्चून भरलेल्या सभागृहात गणेश घुले यांनी डॉ.आनंद नाडकर्णी यांना बोलते केले. तरुणाईच्या समस्यांचे निरसरण करणा-या या मुलाखतील डॉ.नाडकर्णी यांनी एकेएका प्रश्नाच्या उत्तरात सोदाहरण संवाद साधला. ते म्हणाले, वेदना, दुःख, आनंद, विरह ही प्रत्येक भाषला मानवाला नवनिर्मिती करण्याची प्रेरणा देते. आपण जे बोलतो, लिहितो त्यांला अनुभवाचा आधार असल्यास ते अधिक धारधार होते. यासाठी वाचलेल प्रत्यक्ष पाहता व ऐकता आले पाहिजे, इतके वाचनाशी आपण एकरुप झाले पाहिजे. आपण लिहित असलेली दैनंदिनी ही जीवनाचा आरसा असते, त्यामुळे लिहित रहा असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला. सध्याची वैद्यकीय प्रणाली ही आरोग्य केंद्रीत नव्हे तर आजार केंद्रीत असल्यामुळे आजारावर इलाच केला जातो. वास्ताविक माणसाचं शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहण्यासाठीची पध्दती विकसीत केली पाहिजे, असेही डॉ.नाडकर्णी म्हणाले. आयुष्यात अडचणी आल्यास व्यथित न होता मोडून न पडता जीवनाला र्धेर्याने सामोरे जा तसेच व्यसन व जीवन यापैकी एकदाच मिळते यांचा विचार करा , असेही ते म्हणाले. सुमारे दीड तासांच्या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्से , कथा तसेच स्वअनुभव सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविकात डॉ.दासू वैद्य यांनी पाणवठा, विविध व्याख्यानमाला या विद्यार्थ्यांच्या मनाची मशागत करीत असल्याचे सांगितले. केशरचंद राठोड यांनी सूत्रसंचालन तर सृष्टी पोफळे हिने आभार मानले.

व्याख्यानमालेत आज
तीन दिवसीय व्याख्यानमालेत दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. १८) प्राचार्य नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत पुणे येथील सुप्रसिध्द निवेदक व नाट्य अभ्यासक लक्ष्मीकांत धोंड ‘आद्य मराठी काव्य गाथा सप्तशती समजून घेताना’ या विषयावर विचार मांडतील. तर बुधवार दि. १९ मार्च रोजी प्रा.वा.ल.कुळकर्णी व्याख्यानमालेत परभणी येथील सुप्रसिध्द कवी प्रा. इंद्रजित भालेराव हे ‘विद्यापीठातील भारलेले दिवस’ या विषयावर अनुभव कथन करतील. या तीन दिवसीय व्याख्यानमालेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन विभागप्रमुख डॉ. दासू वैद्य व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी केले आहे.
