मुक्त विद्यापीठातर्फे “शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार” साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे पारंपारिक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्ये करणाऱ्या व्यक्तीस अथवा शिक्षण संस्थेस आळीपाळीने शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान केला जातो. विद्यापीठाच्या पुरस्काराचे स्वरूप रू 21,000/- रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे.

Yashwantrao Chavan Maharashtra Open University,, Gyan Gangotri, Nashik ycmou

सदरचा पुरस्कार शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी देण्यात येतो.

या वर्षीचा हा पुरस्कार पारंपारिक शिक्षण क्षेत्रात वैचारिक लेखन, संशोधन, नाविन्यपूर्ण प्रयोग, कृती, किंवा चळवळीव्दारे भरीव कार्य केलेल्या व्यक्तीस अथवा शिक्षण संस्थेस 2023 चा हा पुरस्कार दिला जाणार आहे. कृपया इच्छूक व्यक्तींनी स्वतःचा किंवा आपल्या माहितीतील पात्र व्यक्तीचे नामनिर्देशन सविस्तर माहितीसह विद्यापीठाच्या वेबसाईट https://ycmou.digitaluniversity.ac वरुन छापील अर्ज प्रिंट काढून दिनांक 26 ऑगस्ट, 2024 पर्यंत खालील पत्त्यावर पाठविण्यात यावे.

अर्ज प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्काराबाबत पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल.

सोबत आपल्या किंवा संबंधित पात्र व्यक्तीच्या कार्याचे दृकश्राव्य, रेकॉर्डिंग, वृत्तपत्र कात्रणे व फोटो जोडावेत असे आवाहन कुलसचिव दिलीप भरड व प्र प्रमुख, डॉ दयाराम पवार, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्र यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता :

प्र प्रमुख, विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्र,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

ज्ञानगंगोत्री, गोवर्धन शिवार, गंगापूर धरणाजवळ,

नाशिक – 422 222.

दूरध्वनी क्रमांक : (0253) 2230127ईमेल : dir_dsw@ycmou.digitaluniversity.ac

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com