श्री शिवाजी महाविद्यालयातील डॉ प्रशांत सराफ यांची एनसीसीच्या कॅप्टनपदी पदोन्नती

परभणी : श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना विभागाचे प्रमुख डॉ प्रशांत सराफ यांची कॅप्टनपदी पदोन्नती करण्यात आली आहे. डॉ प्रशांत सराफ हे ५२ महाराष्ट्र बटालियन नांदेड अंतर्गत येणाऱ्या सदरील महाविद्यालयातील मुले-मुली युनिटचे लेफ्टनंट म्हणून मागील बारा वर्षांपासून काम पाहत आहेत. सोमवार (दि ५) रोजी नांदेड येथील एनसीसीच्या बटालियन मध्ये कमांडिंग ऑफिसर कर्नल रंगा राव, प्रशासनिक अधिकारी कर्नल के दिलीप रेड्डी यांनी डॉ प्रशांत सराफ यांना कॅप्टनपदी पदोन्नती बहाल केली. डॉ सराफ यांनी कॅप्टन पदी पदोन्नतीसाठी आवश्यक असलेले सैन्य प्रशिक्षण आणि त्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेता त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली आहे.

Advertisement
Promotion of Dr. Prashant Saraf from Sri Shivaji College as Captain of NCC
डॉ प्रशांत सराफ यांना कॅप्टन पदी पदोन्नती बहाल करताना एनसीसीच्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल रंगा राव, प्रशासनिक अधिकारी कर्नल के दिलीप रेड्डी दिसत आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ उत्कर्ष किट्टेकर तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page