एमजीएममध्ये प्रोजेक्ट आयटूआयचे उद्घाटन संपन्न

सिंगापूरच्या विद्यार्थी शिष्टमंडळाचे एमजीएममध्ये करण्यात आले स्वागत

छत्रपती संभाजीनगर : एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, एमजीएम विद्यापीठ आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट आयटूआय’ या विशेष उपक्रमांतर्गत सिंगापूर येथून आलेल्या विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचे एमजीएममध्ये उत्साहपूर्ण वातावरणात आज स्वागत करण्यात आले. आज द्योतन सभागृहात ‘प्रोजेक्ट आयटूआय’ चे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.

Project i2eye inaugurated at MGM

यावेळी सिंगापूर शिष्टमंडळातील प्रोजेक्ट आयटूआयचे संचालक डॉ.रुपेश अगरवाल, डॉ.सतीश रामपटना, डॉ.रोहित अगरवाल तर एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेंद्र बोहरा, वैद्यकीय अधिक्षिका डॉ.अपर्णा कक्कड, अधीक्षक डॉ.राघवन, अधीक्षक बी.के.सोमाणी, नेत्र विभागप्रमुख डॉ.सारिका गाडेकर, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.

Project I2I inaugurated at MGM

यावेळी बोलताना डॉ.पी.एम.जाधव म्हणाले, सिंगापूर येथून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाचे एमजीएममध्ये स्वागत करतो. आपणा सर्व विद्यार्थ्यांना भारतात अनेक गोष्टी शिकता येतील त्याचप्रमाणे आम्हालाही आपल्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. कोणीही परिपूर्ण नसून शिकण्याची प्रक्रिया कायम सुरू असते. या एका आठवड्यात आपण प्रत्येक मिनिटाचा वापर करीत हा वेळ शिकण्यासाठी व्यतीत करा.

Advertisement
Project I2I inaugurated at MGM

रुग्ण डॉक्टरांकडे येण्यापेक्षा डॉक्टर रुग्णांकडे जाऊन तपासणी करण्यासाठी ‘प्रोजेक्ट आयटूआय’ हा उपक्रम २०१९ मध्ये सुरू करण्यात आला आहे. या अगोदर ओरिसा, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. दरवर्षी अशा प्रकारच्या प्रकल्पाचे आयोजन करण्यात येत असते. विशेषत: या उपक्रमात वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी होत असतात. एमजीएमचे विद्यार्थी आणि सिंगापूरचे विद्यार्थी एकत्रितरित्या पुढील एक आठवडा छत्रपती संभाजीनगर येथील ४ ठिकाणी विविध शिबिरांच्या माध्यमातून रुग्ण तपासणीचे काम करणार असल्याचे प्रोजेक्ट आयटूआयचे संचालक डॉ.रुपेश अगरवाल यांनी यावेळी सांगितले.

Project I2I inaugurated at MGM University

‘प्रोजेक्ट आयटूआय’ शिष्टमंडळात सिंगापूर येथून आलेल्या २८ विद्यार्थ्यांसह ३ प्राध्यापकांचा समावेश आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेत्र विभागप्रमुख डॉ.सारिका गाडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.मधुरा राजन यांनी केले. ‘प्रोजेक्ट आयटूआय’ यशस्वी करण्यासाठी एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित मान्यवर आपले योगदान देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page