गोंडवाना विद्यापीठात प्रा मनिष उत्तरवार यांनी स्विकारला संचालक (न न व सा) पदाचा कार्यभार

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संचालित नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालकपदी प्रा मनिष उत्तरवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शुक्रवार, दि १२ जुलै २०२४ रोजी संचालक पदाचा पदभार स्विकारला असून सदर पदाचा कार्यभार हाती घेतला आहे.

या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु तथा प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ अनिल हिरेखन तसेच कर्मचारी वृदांनी प्रा मनिष उत्तरवार यांचे अभिनंदन करुन स्वागत केले.

तत्पुर्वी प्रा उत्तरवार यांनी २०१२-१५ दरम्यान अभियांत्रीकी विद्याशाखेचे अधिष्ठाता तसेच २०१८-२३ दरम्यान संचालक (न न व सा) म्हणून विद्यापीठात सेवा प्रदान केलेली होती. त्यांच्या दिर्घकालीन बहुआयामी कार्यानुभवाच्या आधारावर तसेच विद्यापीठाच्या शिर्ष नेतृत्वातंर्गत गोंडवाना विद्यापीठात येणाऱ्या काळात देशपातळीवर नवी उंची व लौकिक प्राप्त करु असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com