डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा डॉ वसंत लुंगे यांची ‘आयएमए च्या राष्ट्रीय सहसचिवपदी’ निवड

अमरावती : आयएमएच्या राष्ट्रीय स्तरावर कार्यकारिणी सदस्य तथा डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथे प्राध्यापक असलेले डॉ वसंत लुंगे यांची आयएमए च्या राष्ट्रीय सहसचिवपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्यल माहाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ वसंत लुंगे यांच्या माध्यमातुन वैद्यकीय क्षेत्रात उदभवत असलेल्या समस्यांचे निराकरण होईल अशी अपेक्षा डॉ अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. डॉ वसंत लुंगे यांनी मेळघाटातील आदिवासी गावे दत्तक घेऊन विविध प्रकारच्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्रयत्नशिल असतात तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यापासून वैद्यकीय व्यवसाय करीत असलेल्या डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असतात.

याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com