प्रा अमोल भोई यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रदान
पुणे : जी एच रायसोनी काॅलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजेमेंटच्या इलेक्ट्रॅानिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रा अमोल भोई यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी नुकतीच प्रदान करण्यात आली.

त्यांनी चॅनेल माॅडलिंग फाॅर मिली मीटर वेव्ह कम्युनिकेशन सिस्टिम युजिंग मशीन लर्निंग अप्रोच या विषयावर संशोधन करून शोध प्रबंध सादर केला. सायन्स आणि टेक्नाॅलाॅजी विद्याशाखेतील डाॅक्टर ऑफ ऑफ फिलाॅसाॅफी (पीएचडी) पदवी डाॅ वैभव हेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली.
रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी, आणि कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी आणि रायसोनी कॉलेज, पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खराडकर यांनी प्रा अमोल भोई यांचे हार्दिक अभिनंदन केले.