प्र-कुलगुरू डॉ वाल्मीक सरवदे यांची शैक्षणिक धोरण सुकाणू समितीवर नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ वाल्मीक सरवदे यांची राज्याच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या सुकाणू समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणी संदर्भात येणाऱ्या अडचणी निवारणासाठी उपायोजना मार्गदर्शन करण्यासाठी सदर समितीची पुर्नस्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ३० ऑगस्ट रोजी शासन आदेश करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राची राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सुकाणू समिती जाहीर झाली आहे.
आगामी काळात शैक्षणिक क्षेत्राला दिशा देणाऱ्या या सुकाणू समितीत प्र-कुलगुरू डॉ वाल्मीक सरवदे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. यापूर्वीही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या विविध समित्यांवर त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या नियुक्तीबद्दल प्र-कलगुरु डॉ सरवदे यांचे कुलगुरू डॉ विजय फुलारी, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, सामान्य प्रशासन विभागप्रमुख डॉ कैलास पाथ्रीकर यांनी अभिनंदन केले आहे.