शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागात प्रेमचंद जयंती साजरी
प्रेमचंद यांचे साहित्य मानव जीवनाला दिशा देणारे – डॉ तृप्ती करेकट्टी
कोल्हापूर : हिंदीचे प्रसिद्ध लेखक मुंशी प्रेमचंद यांनी साहित्याच्या माध्यमातून तत्कालीन समाजाचे वास्तववादी चित्रण केले. जे आजही विश्व स्तरावर समस्त मानव जीवनाला दिशा देण्याचे काम करते. असे प्रतिपादन हिंदी विभागाच्या प्र प्रमुख डॉ तृप्ती करेकट्टी यांनी केले.
त्या शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये मुंशी प्रेमचंद यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होत्या. या प्रसंगी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इंग्रजी विभागाचे डॉ ए एम सरवदे, डॉ राजश्री बारवेकर, डॉ सी ए लंगरे, डॉ दीपक भादले, डॉ सुरेंद्र उपरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ प्रकाश मुंज, डॉ संतोष कोळेकर, प्रा प्रकाश निकम, डॉ जयसिंग कांबळे, संशोधक विद्यार्थिनी मेघा तोडकर, शितल खैरमोडे यांनी प्रेमचंद यांच्याविषयी विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक डॉ रमेश खबाले यांनी केले. आभार डॉ अक्षय भोसले यांनी मांडले. सूत्रसंचालन श्रावणी चिपळूणकर हिने केले. यावेळी डॉ सुषमा चौगले, प्रा अनिल मकर, डॉ सुवर्णा गावडे यांच्यासह संशोधक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.