‘स्वारातीम’ विद्यापीठाची पी एच डी पूर्व ‘पेट-२०२४’ परीक्षा रद्द

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची पी एच डी पूर्व ‘पेट-२०२४’ परीक्षा अंदाजित वेळापत्रकानुसार दि ३१ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. परंतु या कालावधीमध्ये युजीसीच्या ‘नीट’ परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून विद्यापीठाची दि. ३१ ऑगस्ट रोजी होणारी पी एच डी पूर्व ‘पेट-२०२४’ परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

SRTMU Nanded

याबाबतचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. तरी संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी  याची नोंद द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ डी एम खंदारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com