सौ के एस के महाविद्यालयात प्रश्न मंजूषा स्पर्धा संपन्न
बीड : येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दि 24 जानेवारी रोजी विज्ञान मंडळाच्या वतीने प्रश्न मंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शिवानंद क्षीरसागर म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञाननिक दृष्टीकोन निमार्ण होऊन चिकित्सा वाढावी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा इत्यादीसह विविध उद्देश डोळयासमोर ठेऊन अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच महाविद्यालयातील पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सतीश माऊलगे यांनीही या प्रसंगी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत 76 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस दिले जातात.यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर,उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, कमवि उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, डॉ. सुधाकर गुट्टे, कार्यालयीन अधिक्षक डॉ.विश्वांभर देशमाने, विज्ञान मंडळाचे प्रमुख डॉ.पी.बी.सिरसाट, प्रा.गणेश देशमाने , राहूल सोनवणे, अनिल जाधव, आदीसह महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.