डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त पोवाडा, व्याख्यान, मिरवणूकीचे आयोजन
डॉ प्रकाश पवार यांचे व्याख्यान
’सकलजनवादी शिवराय’ वर व्याख्यान
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पोवाड्याचा कार्यक्रम, व्याख्यान, मिरवणूक आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास संचालक डॉ कैलास अंभुरे यांनी दिली.



डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १८ व १९ रोजी विविध कार्यक्रम होणार आहेत. यंदा प्रख्यात लेखक, विचारवंत व राजकीय भाष्यकार डॉ प्रकाश पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये मंगळवारी दि १८, सायंकाळी पाच वाजता शिवशाहीर साईनाथ इंगळे यांचा पोवाडयाचा कार्यक्रम होईल. तर बुधवारी दि १९ छत्रपती शिवरायांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात येईल. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा ते छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा या दरम्यान सकाळी ८ ते १० दरम्यान मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर मुख्य इमारती समोरील हिरवळीवर मुख्य कार्यक्रम होणार आहे.
सध्या गाजत असलेल्या ’सकलजनवादी शिवराय’ या ग्रंथाचे लेखक, विचारवंत तसेच राजकीय भाष्यकार डॉ प्रकाश पवार असून ते याच विषयावर विचार मांडणार आहेत. कुलगुरु डॉ विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ रविकिरण सावंत, डॉ अपर्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील. शिवजयंतीच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर व विद्यार्थी विकास संचालक डॉ कैलास अंभुरे यांनी केले आहे.