“डॉबाआंम” विद्यापीठाच्या मराठी विभागात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कविसंमेलन
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठी भाषा वाङ्मय विभाग आणि विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त सोमवार (दि २७) निमंत्रित कवींच्या कविसंमेलनाचे आयोजन केले आहे.

कवयित्री डॉ प्रतिभा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कवी संमेलनामध्ये उर्मिला चाकूरकर, अभय दाणी, डॉ ललित अधाने, माधुरी चौधरी, हबीब भंडारे, रवी कोरडे, संतोष आळंजकर, हनुमान व्हरगुळे व गिरीश जोशी या निमंत्रित कवींचा सहभाग आहे. हा कार्यक्रम मराठी विभागाच्या सभागृहामध्ये दुपारी १२:०० वा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विभागप्रमुख डॉ दासू वैद्य, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर आयुक्त डॉ अरविंद लोखंडे व समन्वयक डॉ कैलास अंभुरे यांनी केले आहे.