अमरावती विद्यापीठात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी

कुलगुरूंनी उपस्थितांना दिली सद्भावना दिनाची प्रतिज्ञा

अमरावती : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून विद्यापीठात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी विद्यापीठाच्यावतीने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन अभिवादन केले व उपस्थितांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.

Advertisement

जयंती कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ व्ही एम मेटकर, डॉ एस व्ही डुडुल, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील, प्रा अनिता पाटील, उपअभियंता (विद्युत) राजेश एडले, उपकुलसचिव मिनल मालधुरे, विक्रांत मालवीय, कुलसचिव रविंद्र सयाम तसेच विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क विभागातील डॉ विलास नांदुरकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page