नाट्य लेखक दत्ता पाटील यांचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे सत्कार
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नाट्य शास्त्र विभागाचे सहयोगी सल्लागार तथा प्रसिद्ध नाट्य लेखक दत्ता पाटील यांना ‘कृष्णविवर’ या नाट्यलेखनाबद्दल नुकताच महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट संहिता लेखनाचा प्रथम पुरस्कार घोषित झाला आहे. याबद्दल विद्यापीठात पाटील यांचा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य तथा नाशिक रोड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे सह संचालक डॉ जी व्ही गर्जे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्राध्यापिका तथा मुक्त विद्यापीठाच्या वित्त समितीच्या सदस्य डॉ वाणी लातूरकर, विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड, वित्त अधिकारी डॉ गोविंद कतलाकुटे, ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्राचे ग्रंथपाल डॉ प्रकाश बर्वे उपस्थित होते.