सौ के एस के महाविद्यालयात वृक्षरोपण संपन्न

बीड : नवगण शिक्षण संस्थेचे सौै केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शासनाच्या एक पेड माँ के नाम वृक्ष लागवड योजने अंतर्गत वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला.

या निमित्त महाविद्यालयाच्या परिसरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, कमवि उपप्राचार्य काकडे  एन आर, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व कार्यक्रमाधिकारी डॉ बी जे राठोड, डॉ पी बी इरलापल्ले, डॉ प्रमोद गायके, डॉ इमाद सर आदीसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com