मिल्लिया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने च्या वतीने कामखेडा येथे वृक्षारोपण
बीड : येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे कामखेडा ता. जि. बीड येथील विशेष शिबिरामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना परिसर व कब्रस्तान येथे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये चिंच, भावा, बकुल, कदंब, जांभूळ, लिंब, फणस, करंजी, अवला इत्यादींची रोपटी शेख शफिक महेमूद (उपसरपंच, कामखेडा) यांच्या शुभहस्ते लावण्यात आली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ यांनी समाजामध्ये पृथ्वीबद्दल जागरूकता निर्माण करणे, हिरवाईचे संगोपन करणे व वृक्ष लागवडीचे महत्त्व, पर्यावरण विषयक जागृती निर्माण करणे आवश्यक असून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड करून त्याची जोपासना करावी असे सांगितले.
सर्वांनी मिळून रोपटी लावली व त्यांचे संवर्धन, संगोपन, संरक्षण करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास शेख मुसा (ग्रामपंचायत सदस्य, कामखेडा), अनिस खाजा बेग, शेख सलीम भाई, छगन वाघमारे, डॉ. अब्दुल अनीस, डॉ. शेख गफूर अहेमद, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर मिर्झा असद बेग, डॉ. शेख रफीक, डॉ. शेख एजाज परवीन, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांची उपस्थिती होती. वृक्षारोपण कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे मार्गदर्शन लाभले.