राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात इन्व्हेंटिस रिसर्च लॅबचा प्लेसमेंट ड्राईव्ह
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बुटीबोरी येथील इन्वेन्टीज रिसर्च लॅब प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला. महाराज बाग चौक स्थित विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात बुधवार दिनांक 14 मे 2025 रोजी हा प्लेसमेंट ड्राईव्ह पार पडला.

यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ सुभाष कोंडावार, प्रभारी कुलसचिव डॉ संजय कवीश्वर, विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ भूषण महाजन, इन्व्हेंटिस कंपनीच्या एच आर मॅनेजर मेघा खापेकर व एडीएल विभागातील राजू कुमार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कंपनीकडून आरएनडी केमिस्ट या पदाकरिता हा प्लेसमेंट ड्राईव्ह राबविण्यात आला. प्लेसमेंट ड्राईव्ह करिता एकूण ५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
चाळणी परीक्षेकरिता विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण २८ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती. लेखी परीक्षा घेण्यात आल्यानंतर १७ विद्यार्थी मुलाखतीकरिता पात्र ठरले. यातील १० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या प्राॅडक्शन युनिटमध्ये सामावून घेतले जाणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रति वर्ष २.२५ लाखाचे पॅकेज दिले जाणार आहे.
