जी एच रायसोनी आंतरराष्ट्रीय स्कील टेक विद्यापीठाचे प्रा दयानंद वासुदेव सुर्यवंशी यांना पीएचडी प्रदान
पुणे : जी एच रायसोनी आंतरराष्ट्रीय स्कील टेक विद्यापीठ, पुणे येथे परीक्षा नियंत्रक पदावर कार्यरत असलेले प्रा दयानंद वासुदेव सुर्यवंशी यांना जे जे टी विद्यापीठ राजस्थान यांच्याकडून कॉम्प्युटर सायन्स शाखेची पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.
त्यांनी “पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड (EHR) अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून असलेल्या संधी आणि आव्हानांचा अभ्यास या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. यासाठी त्यांना डॉ एस के यादव आणि डॉ अभिजित कैवाडे यांनी मार्गदर्शन केले.
रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी सर, कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी सर, आणि जी एच रायसोनी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, पुणेचे कुलगुरू डॉ एम यू खरात यांनी डॉ सुर्यवंशी आणि स्किल टेक विद्यापीठातील प्राध्यापक आणि सहकारी यांनी या यशासाठी अभिनंदन केले आहे.