डॉ जे जे मगदूम फार्मसी महावि‌द्यालयात फार्मासिस्ट डे उत्साहात साजरा

जयसिंगपूर : जागतिक फार्मासिस्ट दिन हा दर वर्षी 25 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस जागतिक आरोग्य सेवा सुधारण्यात फार्मासिटच्या महत्वपूर्ण भूमिकेब‌द्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. यावर्षीची जागतिक फार्मसी के थीम फार्मासिस्टः “मीटिंग ग्लोबल हेल्थ नौड अशी होती. डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेज, जयसिंगपूर आणि जयसिंगपूर ड्रगिस्ट अॅड कैमिस्ट असोसिएशन यांच्यातर्फे जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला. या निमिताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सुमारे ५०० विद्यार्थी आणि नोंदणीकृत फार्मासिस्ट यांच्या सहभागाने काढण्यात आलेल्या फार्मासिस्ट रॅलीने झाली. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून पार पडली, ज्यात फार्मासिस्टच्या भूमिकेचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यात आले. रॅलीदरम्यान फार्मासिस्टच्या योगदानाब‌द्दल जनजागृती केली गेली. यावेळी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन चे संचालक आप्पासाहेब काटगे, संचालिका विद्याराणी चौगुले, जयसिंगपूर शहर कैमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष किरण लटगे व संचालक मंडळ उपस्थित होते.

Advertisement

यासोबतच, वि‌द्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या पथनाट्य माध्यमातून औषधाच्या योग्य वापराचे महत्त्व आणि औषधनिर्माण क्षेत्रातील आव्हाने प्रभावीपणे सादर करण्यात आली. या पथनाट्यांनी फार्मासिस्टच्या कामाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, वकृत्व स्पर्धा, पोस्टर मेकिंग आणि घोषवाक्य निर्मिती स्पर्धाचे आयोजनही करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये वि‌द्यार्थ्यांनी फार्मासिस्टच्या सामाजिक भूमिकेवर विचार मांडले.

यावेळी बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनील गुंडा हक्के, मुख्य औषध निर्माण अधिकारी, प्राथमिक आरोग्य कैद, जयसिंगपूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ शितल कुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महावि‌द्यालयाचे प्राचार्य यांनी सर्वांना फार्मसीस्ट दिनाचे महत्त्व समजावून सांगितले तसेच व जगातील भारताचे फार्मसी क्षेत्रातील योगदान पटवून दिले. विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

तसेच डॉ जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम, वाईस- चेअर पर्सन ऍड डॉ सोनाली मगदू‌म यांनी जागतिक फार्मसी दिनाच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी कॉलेजमधील शिक्षक वि‌द्यार्थी आणि असोसिएशनच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉलेजमधील शिक्षक, विद्यार्थी आणि असोसिएशनच्या सदस्यांनी मोठ्‌या उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा प्रणिल तोरसकर आणि प्रा सोनल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page