डॉ डी वाय पाटील विद्यापीठात “पीरीओ – कनेक्ट 2024” अधिवेशनाची उत्साहात सांगता

पिंपरी : डॉ डी वाय पाटील दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, पिंपरी, पुणे व इंडियन सोसायटी ऑफ पीरियडॉन्टोलॉजी (ISP) स्टडी ग्रुप, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “पीरीओ – कनेक्ट 2024” अधिवेशन दि 9 ते 10 ऑगस्ट 2024 या दोन दिवसीय अभ्यास सत्राचे आयोजन डॉ डी वाय पाटील विद्यापीठ, पिंपरी पुणे येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विविध मान्यवर, वक्ते व दंत वैद्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अधिवेशनाला उत्साहात सांगता झाली.

‘अपग्रेड द अंडरग्रेडस’ या थीमवर आधारित अधिवेशनामध्ये दंत विद्याशाखेतील पदवीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थीचा सहभागी होता. विद्यार्थ्यांनी पीरियडॉन्टोलॉजी विषयाचे विविध पैलूचा अभ्यास केले या कार्यक्रमांमध्ये अमेरिका आणि व्हिएतनाम चे विशेष वक्ते उपस्थित होते तसेच महाराष्ट्र, गुजरात, दमण, गोवा, कर्नाटक येथील प्रख्यात वक्त्यांचा समावेश होता. थेट संवादाबरोबर, पिरीओ टू इम्प्लांट च्या मूलभूत गोष्टीचे ज्ञान विद्यार्थ्यांना त्यांनी दिले. यात 1400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Advertisement

पीरियडॉन्टोलॉजी म्हणजे दंतचिकित्सेमधील हिरड्या संदर्भातील आजार, संसर्ग, कर्करोग, विविध रोगांचे प्रतिबंध, दंतरोपण, मूलभूत ज्ञान त्या अनुषगांने केलेले संशोधन, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि भविष्यकालीन व्यवस्थापन अभ्यास, याच बरोबर पीरियडॉन्टोलॉजीचे विज्ञान आणि जागरूकता वाढवणे तसेच रुग्णाचे हित साद्य करणे हा या अभ्यास सत्राचा हा प्रमुख उद्देश होता.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क येथील स्कूल ऑफ डेंटल मेडिसिनचे प्राध्यापक डॉ जॉर्जिओस ई रोमानोस, डॉ स्मिता जाधव, प्र-कुलगुरू डॉ डी वाय पाटील विद्यापीठ, पुणे व डॉ दो थी थाओ – उप अधिष्ठाता आणि विभागप्रमुख ओरल पॅथॉलॉजी आणि पीरियडंटोलॉजी फॅकल्टी ऑफ ओडोन्टो-स्टोमॅटोलॉजी, कॅन थो युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन अँड फार्मसी, व्हिएतनाम उपस्थित होते.

या परिषदेत इंडियन सोसायटी ऑफ पीरियडॉन्टोलॉजीचे अध्यक्ष व डॉ डी वाय पाटील दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ डी गोपालकृष्णन, इंडियन सोसायटी ऑफ पीरियडॉन्टोलॉजीचे सचिव डॉ आशिष जैन, सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ अभय कोलते, सोसायटीचे अध्यक्ष डॉ एच एस ग्रोव्हर, सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ नितीन दाणी यांचा सन्मान डॉ डी वाय पाटील विद्यापीठाच्या प्र कुलगुरु डॉ स्मिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

“वेस्ट झोन पेरीओ यूजी कन्व्हेन्शन 2024” ची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या आयोजन समितीचे आयोजन अध्यक्ष डॉ डी गोपालकृष्णन, संघटक सचिव डॉ शरथ कुमार शेट्टी, खजिनदार डॉ संतोष मार्तंडे, आणि वैज्ञानिक अध्यक्ष डॉ अनिता कुल्लोली यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page