डॉ पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ प्रा डॉ सुरेखा तायडे यांचे पुस्तक प्रकाशित
प्रा डॉ सुरेखा तायडे यांचे ‘एडव्हान्सेस इन कार्डिओ-ऑबस्ट्रेटिक्स’ हे पुस्तक प्रकाशित
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व अनुसंधान केंद्र, अमरावती येथील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ सुरेखा तायडे यांच्या वैद्यकीय शिक्षण, स्त्री आरोग्य आणि संशोधन क्षेत्रातील २५ वर्षाच्या दीर्घ मौलिक योगदानामुळे त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.
त्यांच्या ‘एडव्हान्सेस इन कार्डिओ ऑबस्ट्रेटिक्स’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तका बद्दल आणि त्यांना मिळालेल्या अनेक सन्मानांबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख तसेच संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख यांनी अभिनंदन केलेले आहे.
डॉ सुरेखा तायडे यांच्या वैद्यकीय शिक्षण, स्त्री आरोग्य आणि संशोधन क्षेत्रातील मौलीक योगदानाचा विद्यार्थ्यांसह संपुर्ण समुदायाला लाभ होईल असे मत अधिष्ठाता डॉ देशमुख यांनी व्यक्त केले आहे.