नॅनो सायन्स अधिविभागाच्या वैज्ञानिक प्रदर्शन स्पर्धेत हायस्कूल व कॉलेेजच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स ॲण्ड बायोटेक्नॉलॉजी अधिविभागामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधुन ओपन डे इव्हेंट अंतर्गत वैज्ञानिक प्रदर्शनात पोस्टर व मॉडेल सादरीकरण स्पर्धांचे आयोजन दि. 26 व 27 फ्रेबु्रवारी 2024 रोजी मोठया उत्साहात पार पडले. सदर स्पर्धेचे आयोजन शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स आणि भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबई यांच्यामधील सामंजस्य कराराअंतर्गत करण्यात आले. ही स्पर्धा इयत्ता नववी ते बारावी विज्ञान शाखेच्या विद्यर्थ्यांचा, एक गट तर विज्ञान शाखेतील पदवीच्या विद्यार्थ्यांचा दुसरा गट याप्रमाणे घेण्यात आली. स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हयातील हायस्कूल आणि कॉलेजच्या 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी आयोजित स्पर्धेस व नॅनोसायन्स अधिविभागाच्या विविध संशोधन प्रयोगशाळांस भेट दिली.
स्पर्धेचे उदघाटन मुंबई येथील भाभा अनुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रभात सिंग व डॉ. अपुर्व गुलेरिया तसेच अधिविभागाचे संचालक प्रा. के. के. शर्मा, ओपन डे इव्हेंटचे समन्वयक डॉ. के. व्ही. खोत आणि अधिविभागातील सर्व प्राध्यापकांच्या उपस्थितीत पार पडले. स्पर्धेमध्ये पदार्थ विज्ञान, नॅनोसायन्स, उर्जा निर्मिती, हायड्रोजन गॅस निर्मिती, इलेक्टॉनिक स्मार्ट सेन्सर्स, मेमरीस्टर डिवायसेस, नॅनोजैवतंत्रज्ञान, सुक्ष्मजीवांचे निरीक्षण, अतिसुक्ष्म पेशीय उपकरणे, जलशुध्दीकरणाचे नॅनोतंत्रज्ञान या विशयांवर आधारित पोस्टर्स व मॉडेल्सचे सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धा प्रकारांमधून दोन्ही गटातील विद्याथ्यरांना एकूण बारा पारितोशिके देऊन गौरविण्यात आले. याच बरोबर आमंत्रित शास्त्रज्ञांनी उपस्थित सर्व विद्याथ्यरांना संशोधनामधील नॅनोसायन्सचे महत्त्व व्याख्यानाद्वारे आधोरेखित केले. हा कार्यक्रम अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी, नॅनोसायन्सचे संचालक, सर्व प्राध्यापक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याने कुलगुरु प्रा. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरु प्रा. पी. एस. पाटील आणि कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.