परिवर्तनवादी चळवळ च्या वतीने सामाजिक न्याय विभाग संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण

छत्रपती संभाजीनगर : परिवर्तनाचे शिलेदार, परिवर्तनवादी चळवळ च्या वतीने विद्यार्थ्यांची प्रलंबित सर्वच स्वाधार,शिष्यवृत्ती देण्यात यावी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर 1000 मुलांचे वसतिगृह छत्रपती संभाजीनगर येथील जेवणामध्ये अळ्या निघत असून मग त्यावर देखील कारवाई नाही, दुसरे मुलांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हॉस्टेलचे मेंटेनन्स नसल्यामुळे वस्तीग्रहाची सेलिंग तुटून मुलाच्या पायाचे लिगामेंट तुटलेले आहे, हे प्रकार झाकून टाकण्याचे प्रयत्न चालू आहेत.

Advertisement

या सर्व मागण्या घेऊन सामाजिक न्याय विभाग छत्रपती संभाजी नगर येथे विद्यार्थी आमरण उपोषणास बसले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *