शिवाजी विद्यापीठात स्कूल ऑफ नॅनोसायन्स ॲन्ड बायोटेक्नॉलॉजीचा पालक मेळावा यशस्वीरित्या संपन्न
नॅनोसायन्सचे अनेक विद्यार्थी देश विदेशात संशोधन, नोकरी आणि व्यवसायामध्ये यशस्वीपणे कार्यरत – पालकांना याचा सार्थ अभिमान.
शिवाजी विद्यापीठामधील नॅनोसायन्स अधिविभागाच्या विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य – पालक मेळाव्यादरम्यान पालकांचे मत.
विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून स्कूल ऑफ नॅनोसायन्स ॲन्ड बायोटेक्नॉलॉजी अधिविभागाची यशस्वी वाटचाल – उपस्थित पालक.
कोल्हापूर : स्कूल ऑफ नॅनोसायन्स ॲन्ड बायोटेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अधिविभागामध्ये शनिवार, दि.20 रोजी पालक मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमादरम्यान डॉ. के. के. शर्मा, डॉ. के. व्ही. खोत, डॉ. के. डी. पवार, डॉ. वाय. वाय. पाटील, डॉ. एस. ए. सावंत, श्री. एम. एन. पाडवी, डॉ. पी. जे. पाटील यांनी अधिविभागाच्या शैक्षणिक आणि विद्यार्थी केंद्रीत उपक्रमांचा, संशोधन, उपलब्ध सुविधा, नोकरीच्या संधी, परीक्षा, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया बाबत प्राध्यापकांनी विस्तृत माहिती पालकांना समजावून सांगितली. पालक मेळावाच्या उपक्रमांमधून खूप चांगली माहिती मिळाली व अशा प्रकारचे मेळावे आयोजित करण्याची उपस्थित सर्व पालकांनी इच्छा व्यक्त केली.
त्यानंतर अधिविभागाच्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालक आपल्या पाल्याच्या प्रगतीबाबत मनोगत व्यक्त करतेवेळी आनंदाश्रुसमवेत भावूक होऊन अधिविभागाचे खूप कौतुक केले. उपस्थित पालकांमधुन अधिविभागाच्या प्रगती व उपकरणांच्या माहिती सादरीकरणानंतर अधिविभागाबाबत अनेक पालकांनी शुभेच्छा देऊन आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्याची खात्री असल्याचे जाणीवपूर्वक नमूद केले. अधिविभागाचे संचालक प्राध्यापक डॉ. के. के. शर्मा यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित पालकांना नॅनोचे महत्व आणि त्याचे उज्वल भविष्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. के. व्ही खोत यांनी केले. अधिविभागाच्या सर्व प्राध्यापकांनी उपस्थित पालकांच्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीबाबत व्यक्तिीगत माहिती देऊन मार्गदर्शन केले. डॉ. टी. डी. डोंगळे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.