देवगिरी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पालक मेळावा संपन्न
विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या कक्षा रुंदावत मोठी स्वप्न पहावी – पंडितराव हर्षे
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयात दिनांक ६ जुलै रोजी, ११ विज्ञान वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीचे जेष्ठ सदस्य पंडितराव हर्षे आण्णा, पालक मेळाव्याचे संयोजक उपप्राचार्य नंदकिशोर गायकवाड उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पंडितराव हर्षे आण्णा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या कक्षा रुंदावत मोठी स्वप्न पहावी. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर म्हणाले की, ज्ञानामुळे विद्यार्थ्यांवरती चांगले संस्कार होतात, चांगलं ज्ञान प्राप्त केल्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व खुलते.परीक्षेत गुण जास्त घेऊन उपयोग नाही तर आपल्यामध्ये उत्तम संस्कार कसे रुजतील हे महत्वाचे असते. महाविद्यालयाच्या विविध उपक्रमाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी ज्ञान घेण्यापेक्षा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यावर भर द्यावा. याप्रसंगी पालकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या नियोजना सोबतच करिअर विषयी जागरूक राहून काळजी घ्यावी असे आवाहन केले.
पालक मेळाव्यात महाविद्यालयातील विविध विभाग, शिक्षक, महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आयोजित केले जाणारे विविध उपक्रम, महाविद्यालयाचे निकालाची उज्वल परंपरा, विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा ची तयारी करून घेण्यासाठी राबविले जाणारे विशेष तयारी वर्ग, विद्यार्थ्यांच्या करिअर कौन्सिलिंगच्या साठी उपयोजित केले जाणारे उपक्रम, विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयात कार्यरत असलेली सक्षमा समिती, महाविद्यालयाची माहिती वेळेवर पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत असणारा पियर ग्रुप या सर्व उपक्रमांची माहिती पालकांपर्यंत पोहोचावी पालकांच्या महाविद्यालयाच्या प्रति असणाऱ्या अपेक्षा शिक्षकांपर्यंत, व्यवस्थापना पर्यंत पोहोचाव्यात या उदात्त हेतूने पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ किरण पतंगे यांनी केले तसेच महाविद्यालयातील विविध विभागांची माहिती पालकांना डॉ कल्याण माळी यांनी दिली. महाविद्यालयातील विद्यार्थिनी साठी कार्यरत असणारी सक्षमा समिती याविषयी डॉ वंदना जाधव पाटील यांनी माहिती दिली. महाविद्यालयातील JEE, NEET CELL संदर्भात प्रा धनंजय काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या विकास समितीचे जेष्ठ सदस्य पंडितराव हर्षे हे उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ अशोक तेजनकर या पालक मेळाव्याचे संयोजक उपप्राचार्य नंदकिशोर गायकवाड, पर्यवेक्षक अरुण काटे, डॉ किरण पतंगे, विभाग प्रमुख डॉ कल्याण माळी, प्रा बाळासाहेब पवळ, प्रा किरण सुपेकर, प्रा अनघा देशपांडे, डॉ वंदना जाधव पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ मनीषा नाईक, आशा करंडे, डॉ शिवांगी खंदारे, अरुंधती वाडेवाले, सुलक्षणा होळकर आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ रमेश शिंदे यांनी केले.