देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक मेळावा आयोजित करण्यात आला आणि दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील पालक मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ सुभाष लहाने यांच्या प्रास्तविकाने झाली. प्रास्तविक भाषणात संचालकांनी महाविद्यालयाचा आढावा सर्व पालकांच्या समोर सादर केला. यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद व क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाचे योगदाना बाबत माहिती सादर केली. तसेच महाविद्यालयात विविध क्षेत्रातील उपलब्धी पालकां समोर अधोरेखित केल्या. यामध्ये महाविद्यालयास मिळालेल्या राष्ट्रीय पातळीवरील नॅक, एनबीए आणि एनएबीएल या मानांकना विषयी विस्तारित स्वरूपात महत्व पालकांसमोर सादर केली आणि महाविद्यालयाच्या वैयक्तिक सांघिक यशाबद्दल अभिनंदन केले.
त्यानंतर महाविद्यालयाचे निकाल, प्लेसमेंट व इंटर्नशिप संदर्भात पालकांना माहिती दिली व त्याचे महत्व समजावून सांगितले तसेच महाविद्यालयाने या वर्षी ५७५ पैकी ४९० विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची संधी उपलब्ध करून दिल्या या बाबत सविस्तर माहिती पालकांना सांगितली.
तसेच उच्च शिक्षणासाठी GATE परीक्षा पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या सत्रापासून महाविद्यालयामध्ये अनेक नवीन उपक्रमांची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मेळाव्यात पालकांना दिली. पालकांनी आपल्या पाल्याशी त्यांच्या शैक्षणिक प्रगती विषयी सातत्याने संवाद साधावा असे आव्हान केले. यानंतर सर्व पालकांनी संबंधित विभागात जाऊन विभाग प्रमुख व प्राध्यापक वृंद यांच्याशी संवाद साधून आपल्या पाल्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच विभाग प्रमुखांनी पालकांना येणाऱ्या आव्हानासंबंधी तसेच कौशल्य विकास ह्या विषयी मार्गदर्शन केले.या पालक मेळाव्यास महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ सुभाष लहाने, विभागप्रमुख डॉ सत्यवान धोंडगे, डॉ सचिन बोरसे, प्रा संजय कल्याणकर, डॉ गजेंद्र गंधे, डॉ राजेश औटी, डॉ शोएब शेख, प्रा अमरसिंह माळी व अच्युत भोसले यांची उपस्थिती होती.