अमरावती विद्यापीठात 19 मार्च रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

बँक ऑफिस ऑपरेशन पदाकरीता परीक्षा व थेट मुलाखतीव्दारे होणार उमेदवारांची निवड

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 19 मार्च, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. विद्यापीठातील डॉ. के.जी. देशमुख सभागृह येथे पंडित दिनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यामध्ये टाटा कन्सल्टंसी सर्व्हीसेसकडून लेखी परीक्षा व थेट मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

Advertisement

बँक ऑफिस ऑपरेशन पदाकरीता शैक्षणिक पात्रता – B. A., B.Com.,B.C.A., B.A.F., B.B.I., B.B.A., B.B.M., B.Sc.(कृषी शाखेतील पदवी वगळता), अशी असून 2022,2023 आणि 2024 या वर्षात पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच अर्ज करता येईल. आवश्यक कागदपत्रे – मुळ प्रमाणपत्र व झेरॉक्स प्रती TCS Application form Passport size photgraph, Resume, Govt. photo ID proof ( Aadhar, PAN card, Driving Liscence, Passport, Voter ID) SSC Marksheet and Certificate, HSC Marksheet and Certificate Graduation all semister/ all yearwise marksheet Graduation Degree Certificate / Provisional Degree Certificate / Course compiltion Certificate अर्जासोबत संलग्न करावे लागणार आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी व इतर आवश्यक माहितीकरीता https://forms.gle/3zvnHwm8TRU9uB1N9 या लिंकवर जावून माहिती तसेच अर्ज करावे. उमेदवारांनी लिंकवर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन ऑनलाईन अर्ज सादर करावे. अधिक माहितीकरीता 8983419799, 7218331735, 8605654025, 8668256500, 7020758701, 7972632828 यावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय उपायुक्त द. ल. ठाकरे, विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page