राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात हुतात्म्यांना वाहिली आदरांजली

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात गुरुवार, दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी हा कार्यक्रम पार पडला. कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी आदरांजली प्रस्तावाचे वाचन केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी दोन मिनिट मौन (स्तब्धता) पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येते. या कार्यक्रमाला विविध प्राधिकारणींचे सदस्य, अधिष्ठाता सांविधिक अधिकारी, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com