शिवाजी विद्यापीठात ‘समस्या तुमची, साांख्यिकीय उत्तर आमचे’ उपक्रमाचे आयोजन
कोल्हापूर : कोणत्याही क्षेत्रातील क्लिस्ट समस्येसंबंधी शास्त्रिय पद्धतीने माहिती गोळा करून व त्या माहितीचे संख्याशास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून समस्येची यशस्वीरीत्या सोडवणूक करता येणे जवळजवळ शक्य आहे. समाजातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्ती अगर संस्थांना त्यांच्या विविध समस्यांची उकल करण्याकरिता नेहमीच संख्याशास्त्राची व पर्यायाने संख्याशास्त्रज्ञांची मदत घेणे अपरिहार्य असते. ही बाब विचारात घेऊन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील संख्याशास्त्र अधिविभागाने ‘समस्या तुमची, सांख्यिकीय उत्तर आमचे’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे.
अधिविभागामध्ये दिनांक २३ व २४ फेब्रुवारी रोजी Statistical Exploration of Real Problems (वास्तविक समस्यांचे सांख्यिकीय अन्वेषण) या विषयावर परिसंवाद होणार असून याअंतर्गत दिनांक २३ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता ‘समस्या तुमची, सांख्यिकीय उत्तर आमचे’ उपक्रम नियोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये कृषी, उद्योग, व्यवसाय, आरोग्यसेवा, व्यापार, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, संशोधन संस्था, इत्यादी क्षेत्रांमध्ये कार्यरत असणान्या व्यक्तींना तसेच संशोधकांना त्यांच्या क्षेत्रातील प्रश्न अथवा समस्येची उकल करण्याच्या अनुषंगाने आवश्यक तो संख्याशास्त्रीय सल्ला तज्ञांनकडून मोफत दिला जाणार आहे. ज्यांना या संधीचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी आपल्या समस्येविषयीची माहिती https://forms.gle/Q8wW2umRfQWjY8MT7 या लिंकवर भरावी. प्राप्त होणाऱ्या समस्यांपैकी काही निवडक समस्यांवर चर्चा करण्यासाठी संबंधितांना दि. २३ फेब्रुवारी रोजी पाचारण करण्यात येईल व ऊर्वरित समस्यांवर चर्चेसाठी अधिविभागाच्या सोयीनुसार वेळ देण्यात येईल. अधिक माहितीसाठी प्रा. एस. व्ही. राजगुरू यांचेशी ७२७६३४७६१३ या मोबाईल क्रमांकावर अथवा svr_stats@unishivaji.ac.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. अधिकाधिक व्यक्तींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संख्याशास्त्र अधिविभाग डॉ. शशिभूषण महाडिक यांनी केले आहे.