डेक्कन महाविद्यालयात ‘वर्षा पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : नुकत्याच आगमन झालेल्या वर्षा ऋतूचे स्वागत व्हावे, याकरिता ‘वर्षापर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन डेक्कन कॉलेज आर्ट सर्कल तर्फे 31 जुलै 2023 ला दुपारी साडेतीन वाजता मीटिंग हॉल येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात बिल्वपत्र’ हा कथा संग्रह तर ‘ऐहिकाच्या मृगजळात’ हा कविता संग्रह लिहिणाऱ्या कवयित्री पूजा जगदीश भडांगे या त्यांच्या कविता सादर करणार असून त्याचबरोबर कॉलेजमधील विद्यार्थीवृंद हे हिंदी, उर्दू,मराठी, इंग्रजी भाषेतील पावसाशी संबंधित कविता सादर करणार आहेत. या अनोख्या विनामूल्य कार्यक्रमाला निळ्या रंगाचे कपडे परिधान करून वर्षा ऋतूच्या आगमनाचा आनंद घ्यायला सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे,असे आवाहन आर्ट सर्कलच्या समन्वयक डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी केले.