शिवाजी विद्यापीठातर्फे विविध व्याख्यानमालांचे आयोजन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे उच्च शिक्षणाबरोबरच समाजप्रबोधन एक भाग म्हणून एकूण ३८ विविध व्याख्यानमालांचे आयोजन केले जाते. दैनिक पुढारी व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “पुढारीकार पद्मश्री कै डॉ ग गो जाधव स्मृती व्याख्यानमाला” प्रतीवर्षी दिनांक २० मे रोजी आयोजित केली जाते.

Advertisement

सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात सदर व्याख्यानमाला अंतर्गत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडे तीनशेव्या राज्याभिषेक वर्षाच्या औचित्याने “छत्रपती शिवरायांचे असामान्य जीवन आणि कर्तृत्व” या विषयावर ‘पानिपत’ कार विश्वास पाटील (प्रख्यात साहित्यिक व माजी सनदी अधिकारी ) यांचे व्याख्यान राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे सोमवार, दि २० मे २०२४ रोजी सायं. ५:०० वाजता आयोजित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page