श्री बंकटस्वामी महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय भूगोल अभ्यासक्रम कार्यशाळेचे आयोजन
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, भूगोल विभाग इस्रोचे दुरस्त प्रशिक्षण केंद्र आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १२ ऑगस्ट २०२४सकाळी १०:००ते ०४:३० या वेळेत राष्ट्रीय सुदूर संवेदन दिन निमित्त नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गठित भूगोल विषयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळेसाठी भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ ए आय खान, विद्यापीठातील भूगोल विभाग प्रमुख डॉ मदन सूर्यवंशी,अभ्यास मंडळ सदस्य प्रोफेसर डॉ दादासाहेब गजहंस, डॉ सचिन मोरे यांचे मार्गदर्शन संपन्न होणार आहे.
यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्य आयोजक डॉ विवेक मिरगणे, भूगोल विभाग प्रमुख तथा निमंत्रक डॉ शिवाजी मोरे, सह निमंत्रक डॉ जगन्नाथ चव्हाण इस्रो दुरस्त प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक तथा आयोजन सचिव डॉ प्रकाश कोंका यांनी विद्यापीठ परिक्षेत्रातील भूगोल विषयातील सर्व प्राध्यापकांना सदरील कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.