शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये TECHFEST 2K24 राष्ट्रीय स्तरीय तांत्रिक प्रकल्प स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभाग आणि शिवाजी विद्यापीठ इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौंसिल, शिवाजी विद्यापीठ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन (SUKRDF), इंडियन इन्स्टिटयूट ऑफ केमिकल इंजिनीअर्स आणि इंडियन सोसायटी फॉर टेकनिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि ३०/०३/२०४ रोजी TECHFEST 2K24 ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळावी तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील नवनिर्मितीचा सर्वसामान्य लोकांसाठी वापर व्हावा या भूमिकेला अनुसरून या स्पर्धेचे नियोजन केले होते. या वेळी लोक उपयोगी नवनिर्मित प्रकल्पांना बक्षीस व प्रमाणपत्रक देऊन गौरवण्यात आले व विद्यार्थांना नवसंशोधन करण्यास प्रवृत्त व मार्गदर्शन करण्यात आले. या प्रकल्प स्पर्धेमध्ये ऐकून ३१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

या प्रकल्प स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रो डॉ पी एस पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विज्ञान, तंत्रज्ञान व औद्योगिक क्षेत्रातील प्रगती संशोधनांवर अवलंबून असून, वायूप्रदूषण, इंधन तुटवडा, आधुनिक उत्पादनांची आयात अशा अनेक भविष्यातील मोठ्या समस्यांना शाश्वत संशोधनाद्वारे मात करता येते असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी उद्योजक बनून संशोधनाच्या आधारे नव सुधारित उत्पादने, सेवाप्रक्रिया, डिजिटल तंत्रज्ञानांची निर्मिती करून समाजाला विकसित करावे असे आव्हान ही यावेळी प्रो डॉ पी एस पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.

वाहनांपासून होणारे वायुप्रदूषण या जागतिक समस्येवर शाश्वत संशोधनाद्वारे मात करता येत असून संशोधनातुन नवनिर्मित उत्तम दर्जाची यंत्र निर्मिती करता येते. याचे सखोल मार्गदर्शन विभागाचे संचालक प्रो डॉ एस एन सपली यांनी यावेळी केले.

Advertisement

औद्योगिक क्षेत्रामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज असून अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून उद्योजक बनता येते याबद्दल मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, मयुरा स्टील प्रा लिमिटेड कोल्हापूरचे मॅनेजिंग डायरेक्टर रवी डोली यांनी केले.

या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रो डॉ पी एस पाटील, अधिविभागाचे संचालक प्रो डॉ एस एन सपली, SCIIL, SUK चे संचालक डॉ एस डी डेळेकर, स्पर्धेचे समन्वयक डॉ डी एम नांगरे, ए ए डुम, ए बी मडावी तसेच अधिविभागाच्या सर्वशाखांचे समन्वयक, पी ए प्रभू, डॉ आर जे देशमुख, डॉ एस बी चव्हाण, डॉ आय एस उडचन, एम एस साळुंखे, विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

सदर प्रकल्प स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के, प्र-कुलगुरू डॉ पी एस पाटील व कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले आहे.     

या प्रकल्प स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे

मेकॅनिकल इंजिनीरिंग विभाग –

प्रथम क्रमांक : श्रुती बावनकर व ग्रुप (VIT Pune)

द्वितीय क्रमांक : तेजस काकडे व ग्रुप (Department of Technology SUK)

तृतीय क्रमांक : स्वरूप घाटगे (Bharati Vidyapeeth, Kolhapur)

केमिकल इंजिनीरिंग विभाग –

प्रथम क्रमांक :  सौरभ नलुगडे, महांते शकोरे (DY Patil College of Engineering Kolhapur),

द्वितीय क्रमांक : पृथ्वी चिंतामणी व ग्रुप (KLE Dr. MS SheshgiriCOE and Tech. Belagavi)

तृतीय क्रमांक : आम्रपाली रणवीर वप्रतीक पाटील (Department of Technology SUK)

सिव्हिल इंजिनीरिंग विभागातून

प्रथम क्रमांक : रोहित पारधे व ग्रुप (Pillai HOC College of Engineering Panvel)

द्वितीय क्रमांक : हृतिक रहाटनकर व ग्रुप (Department of Technology SUK)

तृतीय क्रमांक : अनिश सहानी (Pillai HOC College of Engineering Panvel)

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीरिंग विभाग –

प्रथम क्रमांक : प्रथमेश शिंदे, हर्षाली देवांग (SMT Kashibai Navale COE Pune)

द्वितीय क्रमांक : अफरान ,अभिषेक व ग्रुप ( SG Bale kundri COE Belagavi)

तृतीय क्रमांक: अभय वासंभेकर (Department  of Technology SUK)

फूड टेकनॉलॉजि विभाग –

प्रथम क्रमांक :   चैताली केसकर व ग्रुप (Department of Technology SUK)

द्वितीय क्रमांक : सृष्टी पाटील व ग्रुप (Department of Technology SUK)

तृतीय क्रमांक : सुरभी शिंग व ग्रुप(Department of Technology SUK) यांनी मिळवला.

कम्प्युटर इंजिनीरिंग विभाग –

प्रथम क्रमांक : रुचिता यादव व ग्रुप (J J Magadum College of Engineering, Jaysingpur)

द्वितीय क्रमांक : अथर्व पाटील व ग्रुप (Annasaheb Dange College of Engineering, Ashta)

तृतीय क्रमांक : अवधूत बागल (Government College of Engineering, Ratnagiri)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page