सरस्वती भुवन महाविद्यालयात सुरमणी पंडित उत्तमराव अग्निहोत्री स्मृति संगीत समारोहाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीने सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संगीत विभागातर्फे सुरमणी पंडित उत्तमराव अग्निहोत्री स्मृति संगीत समारोहाचे आयोजन दिनांक २८/०९/२०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात करण्यात आले आहे या संगीत समारोहात सुप्रसिद्ध संवादिनी वादक आणि पंडित उत्तमराव अग्निहोत्री यांचे नातू ओंकार अग्निहोत्री मुंबई यांचे संवादिनी वादन होणार आहे. त्यांना तबला साथ संगत तनय रेगे मुंबई हे करणार आहेत.

Organized Surmani Pandit Uttamrao Agnihotri Memorial Music Festival at Saraswati Bhuvan College

संगीत क्षेत्रात मराठवाड्याचे नाव देशभर गाजवणाऱ्या या महान कलावंतांचे स्मरण व्हावे आणि त्यांची प्रेरणा नव्या पिढीला सदोदित मिळत राहावी या पवित्र हेतूने सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीने पंडित उत्तमराव अग्निहोत्री स्मृती संगीत समारोह दरवर्षी संपन्न होणार आहे 

या कार्यक्रमात ओंकार अग्निहोत्री संवादिनी वादनासोबत रिजोनियम या त्यांनी स्वतः शोध लावलेल्या वाद्याचे सादरीकरण करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्व श्रोत्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सभा परिवारातर्फे करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com