शिवाजी विद्यापीठात ‘भारतीय गणराज्य आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग’ चर्चासत्राचे आयोजन
कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाच्या कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, राज्यशास्त्र विभाग, गांधी अभ्यास केंद्र आणि नेहरू अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय गणराज्य आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग’ चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत आहे. सदर चर्चासत्र सकाळी दि २५ जानेवारी २०२४, १०.३० ते ४.३० या वेळेत संपन्न होईल. चर्चासत्रात सहभागींना प्रमाणपत्र व भोजन दिले जाईल. चर्चासत्रावेळी पोस्टर प्रदर्शन आयोजित केले जात आहे. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या शेवटी पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसेही दिली जातील. चर्चासत्रात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नाव नोंदणी करावी.
नाव नोंदणी फोन न (०२३१-२६०९३८५) अथवा ई मेल (sgp.chair@unishivaji.ac.in) द्वारे करता येईल. तसेच नोंदणी शुल्क प्रत्यक्ष अथवा गुगल पे द्वारे भरता येईल. नाव नोंदणी करताना आपले व महाविद्यालयाचे नाव, ई-मेल आयडी आणि फोन नंबर द्यावे. या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी प्रा. डॉ. भारती पाटील समन्वयक, कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, प्रा. डॉ. प्रकाश पवार, विभाग प्रमुख व समन्वयक, राज्यशास्त्र विभाग व गांधी अभ्यास केंद्र, प्रा. डॉ. प्रल्हाद माने समन्वयक, नेहरू अभ्यास केंद्र यांनी आवाहन केले आहे.