महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ‘संगम-2024’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आयआयटी बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संगम-2024’ वन हेल्थ राष्ट्रीय परिषदेचे दि 20 व 21 एप्रिल 2024 रोजी मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास आयआयटी बॉम्बेचे उपसंचालक प्रा एस सुदर्शन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) पविसेप, अविसेप, विसेप, गृह विभागाच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु प्रा कारभारी काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सार्वजनिक आरोग्यातील नवीनतम ट्रेंड आणि आव्हानांवर चर्चा करण्यासाठी या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रातील अद्ययावत कौशल्ये मिळविण्याची व अन्य क्षेत्रात नेटवर्क बनवण्यासाठी परिषद महत्वपूर्ण असणार आहे. मेडिकल डिव्हाईस, आयुष, मेन्टल हेल्थ, कृत्रिम बुध्दीमत्ता आणि डिजिटल हेल्थ या संकल्पनांवर ‘संगम-2024’ दोन दिवसीय परिषदेत तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन व चर्चा करणार आहेत.
या परिषदेत गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ श्रीराम सावरीकर ट्रस्ट विथ आयुर्वेदा इन इंडिया या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तसेच आयुर्वेदा प्रसेंट स्टेटस अॅण्ड प्रोस्पेक्टस विषयावर ऑल इंडिया इन्स्टिटयुट ऑफ आयुर्वेेदाच्या संचालिका डॉ तनुजा नेसरी मार्गदर्शन करणार आहेत. आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ मनोज नेसरी आयुष विभागाशी निगडीत विषयावर, म्हैसुर आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ एन अनजानिया मुर्थी पंचकमातील बस्ती चिकित्सा विषयावर, जामनगर येथील इन्स्टिटयुट इन टिचींग अॅण्ड रिसर्च इन आयुर्वेदाचे प्राध्यापक डॉ नेहा तांक शिरोधारा इन स्टेस मॅनेजमेंट विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेत केस स्टडी ऑन वायनाड डिस्टिक्ट विषयावर केरळ येथील हेल्थ सायटिस्ट हेल्थ टेक्नोलॉजीचे डॉ बायजु एन बी, लायडन युनिव्हसिटीचे प्राध्यापक अॅंड्रयू वेब, प्रोटोन थेरपी फॉर कॅन्सर विषयावर टाटा मेमोरियल हॉस्पीटलचे प्राध्यपक डॉ सिध्दार्थ लष्कर, आर अॅण्ड डी इलेक्टॉनिक विभागाच्या प्राध्यापिका सुनिता वर्मा मेडिकल डिव्हास विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मेडेक्स डिव्हासईस एक्पो मध्ये कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) व जेष्ठ अणुसंशोधक डॉ अनिल काकोडकर मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्रात जोधपूर स्कुल ऑफ पब्लिक हेल्थचे संस्थापक अनिल पुरोहित व गोदरेज इंडस्टिचे डॉ राठी गोदरेज, मोबिलिटी ऑफ कंपनीजचे संस्थापक जगदिश हर्ष, इंडियन इन्स्टिटयुट ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक डॉ दिपक सक्सेना, जोधपूर एम्सचे नितीन जोशी चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.
मेंटल हेल्थ विषयावर आयोजित चर्चासत्रात एएफएफसीचे प्राध्यापक डॉ कल्पना श्रीवास्तव मानस- पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आय विलच्या सीओई क्षिप्रा डावर डिजिटल अॅण्ड जनरेटिव्ह एआय अॅप्लीकेशन विषयावर मार्गर्शन करणार आहेत. डिजिटल हेल्थ केअर संकल्पनेवरील चॅलेंज अॅण्ड ऑपॉचुनिटीज विषयावर ऑफिस ऑफ द सायन्टिकचे सल्लागार डॉ शिंधुरा गणपथी, आयआयटीचे प्रा क्षितीज जाधव न्यू इरा इन हेल्थ केअर विषयावर, आय सी आय सी आय फाऊन्डेशनचे संजय दत्ता, दूरस्टेप हेल्थ सर्व्हिसेस प्रा लि चे डॉ सुचित्रा मानकर प्रॅक्टीस इन टेलीमेडिसिन विषयावर, डॉ संकेत चौधरी, डॉ भरत अग्रवाल, डॉ निकेश शहा, दिलीप मार्गदर्शन करणार आहेत. कृत्रिम बुध्दीमत्ता इन डिजिटल हेल्थ विषयावरील पर्सिस्टंट सिस्टीमचे डॉ सोम दत्त, बोस्टन येथील ब्रिंघम अॅण्ड वुमेन्स हॉस्पिटलचे डॉ नारायण प्रसाद कृत्रिम बुध्दीमत्ता इन पब्लिक हेल्थ अॅण्ड फर्टिलिटी विषयावर मार्गदर्शन करणार आहेत
वॅक्सिन अॅण्ड वॅक्सिन डेव्हलपमेंट विषयावर पुणे येथील जिनोव्हा बायोफार्मास्युटिकलचे सीईओ डॉ संजय सिंग कोविड-19 वॅक्सिन विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कोलंबो येथील द ओव्हिओ स्टेट युनिव्हर्सिटीचे डॉ अभय सातोसकर वॅक्सिन फॉर काला आजार विषयावर, पुणे येथील रुबी हॉल क्लिनीकचे डॉ स्मिता जोशी सर्व्हायकल कॅन्सर प्रिव्हेंशन अॅण्ड एचपीव्ही वॅक्सिन विषयावर, दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉस डिसिज कंट्रोलचे डॉ मोनिल सिंघाई रॅबिज वॅक्सिन विषयावर मार्गर्शन करणार आहेत. या चर्चासत्रात प्रा सतिष अग्निहोत्री, रामकुमार, डॉ राकेश कुमार हे सहभागी होणार आहेत.
या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते आयआयटी बॉम्बे येथील व्हीएमसीसी सभागृहात सकाळी 9ः15 वाजता करण्यात येणार आहे. ‘संगम 2024’ परिषद आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती, संशोधक, अभ्यागत व विद्यार्थी यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ व अधिकारी या परिषदेस उपस्थित राहणार आहेत.