गोंडवाना विद्यापीठातील ट्रायसेफ नवसंशोधन केंद्रात पॅकेजिंग कार्यशाळेचे आयोजन
नवउद्याेजकांना मिळणार पॅकेजिंगवर आधारीत प्रशिक्षण
नवउद्योजकांना लाभ घेण्याचे आवाहन
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातंर्गत ट्राईबटेक समूह उद्योजकता प्रतिष्ठान-ट्रायसेफ नवसंशोधन केंद्रामधील उद्योजकांकरीता पॅकेजिंग आधारीत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन दि 13 आॅगस्ट 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता ट्रायसेफ, नवसंशोधन केंद्रात करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये नव उद्याेजकांना पॅकेजिंगवर आधारीत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जमशेदपूर येथील सुरज लाॅजिस्टीक प्रायव्हेट लिमीटेडचे महाव्यवस्थापक प्रविण पुसदेकर यांची उपस्थिती असणार आहे. तरी, ट्रायसेफमधील सर्व नवउद्योजकांनी पॅकेजिंग आधारीत प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ननवसा चे संचालक प्रा मनिष उत्तरवार यांनी केले आहे.