शिवाजी विद्यापीठात एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात दि. 3 फेब्रुवारी, 2024 रोजी युसीजी स्किम फॉर पर्सन व्हिथ डिसॅबिलीटीज् आणि समाशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च शिक्षणातील दिव्यांग व्यक्तीसमोरील संधी आणि आव्हाने या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र रामानुजन हाॅल याठिकाणी आयोजित करण्यात आले हेाते. या चर्चासत्राचे स्वागत व प्रास्ताविक समन्वयिका डॉ. प्रतिभा देसाई यांनी केले. या कार्यक्रमासाठी उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रेरणा शर्मा, मुंबई या उपस्थित होत्या. यांनी उच्च शिक्षणातील दिव्यांग व्यक्तीसमोरील संधी आणि आव्हाने या विषयावर त्यांनी उद्घाटन समारंभाचे भाषण दिले त्यांनी सांगितले उच्च शिक्षणातील दिव्यांगाच्या अडचणी व अडथळे यावर त्यांनी प्रकाश झोत टाकला याचबरोबर दिव्यांगासंदर्भातील सामाजिक व वैद्यकीय प्रारूपे त्यांनी समजावून दिली त्याचबरोबर त्यांनी दिव्यांग कायदयाचे तुलनात्मक पैलू मांडले. यावेळी पाहुण्याची ओळख डॉ. पुजा पाटील यांनी केली व या सत्राचे आभार डॉ. प्रल्हाद माने यांनी मानले. यावेळी समाजशास्त्र अधिविभागाचे प्रा. प्रा. डॉ. जगन कराडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषण केले. यावेळी समाजशास्त्र अधिविभागाच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रतिमा पवार हया उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये प्रमुख वक्ते म्हणून डॉ. एम. एस. वासवाणी यांनी उच्च शिक्षण संस्थांनी दिव्यांग विद्याथ्र्यासाठी काय केले पाहिजेश् या विषयावरती आपले मत मांडले. यावेळी या सत्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाले हे उपस्थित होते. या सत्राचे आभार कोमल ओसवाल यांनी मानले. राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रास्ताविक परिषदेच्या समन्वयिका डॉ. प्रतिभा देसाई यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मानव्यविद्या विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. देशमुख हे उपस्थित असून त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण व दिव्यांगासाठी उच्च शिक्षणामध्ये कराव्या लागणाÚया सोयीसुविधा यावर त्यांनी भाष्य केले. यावेळी डॉ. नमिता खोत यांनी समारोप प्रसंगी अध्यक्षीय भाषण दिले त्यांनी शिवाजी विद्यापीठातील सर्वसमावेशक केंद्राने दिव्यांगासाठी केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. यावेळी चर्चासत्राच्या समारोप सत्राचे आभार प्रा. डॉ. प्रतिमा पवार यांनी मानले.
भारतातील वेगवेगळया राज्यातील एकुण 28 संशोधकांनी उच्च शिक्षणातील दिव्यांग व्यक्तीसमोरील संधी आणि आव्हाने या विषयावर आपले शोधनिबंध सादरीकरण केले. हे चर्चासत्र हायब्रिड मोडमध्ये घेण्यात आले यावेळी वक्ते व काही संशोधकांनी आपल्या संशोधनाचे ऑनलाईन व ऑफलाईन सादरीकरण केले. यावेळी डॉ. प्रतिमा पवार, प्रा. जगन कराडे, डॉ. प्रल्हाद माने, कोमल ओसवाल, आकाश ब्राम्हणे, डॉ. पुजा पाटील व शिक्षक, संशोधक विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी चर्चासत्राचे सुत्रसंचालन पवन कांबळे आणि अक्षता बिराजदार यांनी केले.