उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एक दिवसीय मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामाजिकशास्त्र प्रशाळेत दि. १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने एक दिवसीय मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

Advertisement
KBCNMU-GATE

शासनाच्या पुरातन विभागाचे तज्ज्ञ या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांना ही कार्यशाळा उपयुक्त राहणार असून नोंदणी शुल्क रूपये २०० आकारण्यात येणार आहे. इच्छुकांनी डॉ. मनोज इंगोले ( मो. क्र.9623627758) व कुणाल महाजन (7397984672) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा. अजय पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page