उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जैवशास्त्र या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेच्या वतीने दि ३० व ३१ जुलै रोजी जैवशास्त्र या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद होत आहे.
उदयोन्मुख संशोधक, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी यांच्यात परस्पर संवाद व्हावा या दृष्टीकोनातून हा परिसंवाद होणार आहे. मंगळवार दि ३० जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गडचिरोली येथील सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी रिसोर्स सेंटरचे अध्यक्ष डॉ सी डी मायी यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन होणार असून कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी अध्यक्षस्थानी राहतील.
उद्घाटनानंतर अमरावती येथील प्रा सतीश मालोदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सत्रात पुणे येथील डॉ अशोक गिरी, जळगावचे डॉ बाल कृष्णा यादव यांचे व्याख्यान होणार आहे. दुसरे सत्र डॉ कानन पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून आय पी आर चेअर प्रो प्रा डी जी हुंडीवाले, मुंबईचे डॉ दिनेश पाटील यांचे व्याख्यान होईल. तीसरे सत्र प्रा पी पी माहुलीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून डॉ सी डी मायी, नंदुरबार येथील वैज्ञानिक डॉ जयंत उत्तरवार यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर पोस्टर्स प्रदर्शन होईल.
बुधवार दि ३१ जुलै रोजी सकाळचे सत्र छत्रपती संभाजीनगर येथील डॉ सतीष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यामध्ये पुणे येथील डॉ मनीष कुमार, इंदौर येथील प्रा मिता जैन यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर तुमसर येथील डॉ के एन साठवणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सत्रात पुणे येथील डॉ प्रशांत ढाकेफळकर, इंदौर येथील डॉ सुनीता कटारीया यांचे व्याख्यान होईल.
दुपारी या परिसंवादाचा समारोप डॉ सी डी मायी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे अध्यक्षस्थानी राहतील. अशी माहिती प्रशाळेचे संचालक प्रा ए जी इंगळे व संयोजन सचिव प्रा के एस विश्वकर्मा, प्रा बी एल चौधरी यांनी दिली.